sixth-banner
परिचय

रवींद्र लकडे ... ठाणे जिल्ह्यातील निसर्गरम्य शहापूर तालुक्यातील शिलोत्तर या गावात 9 डिसेंबर 1984 रोजी एका संस्कारी आणि सर्वसामान्य कुटुंबात रवींद्र लकडे यांचा जन्म झाला. गावात पिढ्यान्‌पिढ्या प्रतिष्ठा लाभलेले, पाटीलकीचा मान असलेले घराणे असले तरीही, त्या घराण्याने राजकारण, समाजकारण, पत्रकारिता किंवा शैक्षणिक क्षेत्रात आजवर कधीही ठसा उमटवलेला नव्हता.

शेतकरी वडिलांची कष्टाळू परंपरा आणि गृहिणी मातोश्रींच्या संस्कारांचे लेणं लाभलेले रवींद्र बालपणापासूनच जिद्दी, अभ्यासू आणि नव्या युगाच्या प्रवाहाशी एकरूप होणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले गेले. तीन बहिणी आणि एक भाऊ यांच्यासह प्रेमळ कुटुंबात वाढत असताना त्यांनी शिक्षणाला सदैव प्राधान्य दिलं.

अर्थशास्त्रात पदवी संपादन करून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या लाटेत त्यांनी कॉम्प्युटर हार्डवेअर या क्षेत्रात स्वतःची वाट निर्माण केली. नव्या युगाची नाडी ओळखून त्यांनी स्थापन केली — ‘रविराज इन्फोटेक’ ही संस्था. त्यांच्या दूरदृष्टी, प्रामाणिक परिश्रम आणि तांत्रिक कौशल्यामुळे या उपक्रमाने अल्पावधीतच भरघोस यश संपादन केलं. शहापूर तालुक्यात पहिल्यांदाच सायबर कॅफे सुरू करण्याचा मान रवींद्र लकडे यांना मिळाला — आणि त्याच क्षणी त्यांनी केवळ तंत्रज्ञानाची दारेच उघडली नाहीत, तर ग्रामीण भागासाठी नव्या डिजिटल युगाचं प्रवेशद्वारही खुलं केलं.

गॅलरी
बातम्या
first-news
14 April 2020
second-news
4 Jul 2023
third-news
19 March 2022
सोशल